कविता-काय फुला?

Started by khushalonbale, December 07, 2015, 11:04:51 AM

Previous topic - Next topic

khushalonbale

काय फुला?

काय फुला,
घमंड कसला तुला?
तुर्यासारखे उंचावून पाकळ्या
हसतोस का तू मला?

अरे मातीचा मी मातीचा तू
ना जातीचा मी ना जातीचा तू....

हसतील दोन दिवस लोक
म्हणून काय शोक?
हा नसता लोकांचा रोकटोक
असता बेअकली संघर्ष माझ्या जीवनाचा....

आहेत काटे माझ्याही भोवती
तुझ्याही भोवती होते
रडलास,चिडलास,पेटलास धगधगत्या उन्हात तू
तेव्हा कुठे झालास तू फुलोरा....
सांग मला असाध्य काय ते?
त्या काट्यांचे बनविण्यास फुल
सोसुदे मज भोग तुझ्यासारखे....

अरे हद्द झाली काळोखाची
काळोखात हरवला अंधार
थरकापल्या दीन चांदण्या
या भयान प्रलयाने....
धगधगते उरात उदंड ज्वालामुखी
काळोखाची करीन राख राखेत मिसळेपर्यंत....

कोदंडातून तीर सुटले विचारांचा उडेल भडका
कळेल तुला वल्लरीसुता ये येथे दोन घटका....

या रणांगणी होतील वार चौफेर
पळतील शञू जसे पळती दर्दुर
स्वागत येणार्या अपयशांचे,घावांचे,जखमांचे
आणि स्वागत येणार्या त्या मृत्युचेही....

-खुशाबराव लोनबले
पवनपार त.सिन्देवाही जि.चंद्रपूर
मो.9689587614