" ती " चा फोन नंबर

Started by shetye_pranav, December 07, 2015, 12:06:40 PM

Previous topic - Next topic

shetye_pranav

सरले ते दिवस, सरले ते क्षण,
काहीतरी राहिल्यासारख वाटतंय तरीपण.
धीर देऊन या शब्दांना मी विचारल तीला जर,
तर देईल का मला ती, " ती " चा फोन नंबर???

अंकगणित नव्हते एवढे कधी अवघड,
विचाराने त्या नंबरच्या झाली माझी पडझड,
विचारात होतो काय असेल तिचा नंबर,
असेल का त्यात दहा कि असेल त्यात शंभर???

अनेक हे प्रयत्न झाले माझे असफल,
अश्या वेळी पुढे आली खऱ्या मित्राची अक्कल,
वापरून त्या मित्राची सहज ती शक्कल,
अखेरच्या प्रयत्नात झालो मी सफल...

एकटवून सगळा धीर झालो मी STRONGER
हळूच विचारला तीला, 'EXCUSE ME, CAN U GIVE ME UR PHONE NUMBER???
चटकन AVOID करून केले तिने मला STRANGER
तरी पुन्हा मी विचारले, मिळेल का तुझा PHONE NUMBER???

शाब्दिक संभाषणाने निर्माण झाली होती जवळीक,
कधी देईल याला नंबर, वाट पाहत होती PUBLIC
चिडवून तिच्या नावाने केला होता यांनी मला वेडा,
कधी सुटेल हा नंबरचा तिढा...

अखेर आला तो दिवस आणी आला तो क्षण,
देण्यासाठी नंबर तिने काढला तिचा फोन,
काय माहित तिच्यासाठी ती तिचा होतो कोण?
मी मागितला एक तिने दिले मला दोन...

झाले होते माझे क्षणिक स्वप्न ते साकार,
येऊ लागला होता माझ्या स्वरानाही आकार,
अखंड बोलून तिच्याशी थकत नव्हतो मी फार,
विचारात तिच्या बुडून गेलो होतो मी फार...

बोलता बोलता पटकन गेली ती बोलून,
बसलाय एक मुलगा माझ्या हृदयात घर करून,
कळले तेव्हा मला तिला होता BOY FRIEND,
आलो या जगती बनण्यासाठी फक्त एक BEST FRIEND...

विश्वास होता माझ्यावर तिला स्वतापेक्षा जास्त,
उमलणाऱ्या प्रेम फुलास केला मी स्वस्थ,
होती एक खंत, झाल्या चुका शंभर,
का मागितला मी " ती " चा फोन नंबर???

प्रणव
७२०८५५०७७१