एक होती शाळा. ..

Started by sukeshini0401, December 07, 2015, 02:34:36 PM

Previous topic - Next topic

sukeshini0401


आठवते का मित्रांनो
एक होती शाळा...

परिपाठाची लगबग - छोट्या वर्गाची बकबक
अभ्यासाची गोडी - मस्ती आणि खोडी
बाईंची धास्ती - मित्रांची दोस्ती
मधली सुट्टीचा डबा - पकडापकडी अन् गप्पा
आठवते का मित्रांनो
एक होती शाळा...   

पीटी ची शिस्त - कार्यानुभव मस्त
सहभोजनाचा घाट - हळदी कुंकू चा थाट
परीक्षेचा बेत - सुट्टी चा वेट
दरवर्षी वर्गात वाढ - आणि ते काजूचे झाड
आठवते का मित्रांनो                           
एक होती शाळा..

आता संपली ती शाळा
अन् सुटले ते मित्र
उरल्या फक्त आठवणी
डोळ्यात पाणी आणि
चेहर्‍यावर हसू आणणारी...

                                  -सुकेशिनी...