जाता जाता.....।

Started by आशिष वाघमारे, December 08, 2015, 09:19:39 PM

Previous topic - Next topic

आशिष वाघमारे

                       !!..जाता जाता..!!

नुसताच वेळ वाया गेला,
काहीतरी लिहाव मनता मनता...
लगेच तुझी अदा भासली,
कवितेचा विचार करता करता...
दिवसा चंद्र,तारे,नक्षत्र दिसले,
सुंदरसा चेहरा तुझा दिसता दिसता...
मदिरेहुनही जास्त नशा चढ़ली,
टिचक्या डोळ्यात तुझ्या बघता बघता...
कळल नाही कधी झाली सांजबदल,
सोबत तुझ्या हसता हसता...
कुठून कुठे पोहचलो त्याच भान नाही,
सोबत तुझ्या चलता चलता...
मनवता तुला इच्छाच मेली,
सतवण्याची तू रुसता रुसता....
इच्छा तर आहे असच जगाव,
सोबत तुझ्या खेळता खेळता...
असच आयुष्य संपून जाईल,
लवल्या पापणीस पाहाता पाहता...
कदाचीत नसशील तू सोबत तेव्हा,
जेव्हा ओठी नाव येईल तुझ जाता जाता...

आशिष वाघमारे
9156075285