कुठे रे दडलास?

Started by शिवाजी सांगळे, December 12, 2015, 12:31:49 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कुठे रे दडलास?

अपराध्या न्याय दिला तूू
प्रामाणिका शिक्षा
अशी कशी केलीस तू?

बजावुन कर्तव्या, अपमृत्यु !
पिणा-यां मोकळे रान
अन् सामान्यां फसविलेस तू !

देवा, कुठे रे दडलास तू?
गरीब श्रीमंतात
कोणता झेंडा रोवलास तू?

किती शिशुपालांचे अपराध
असे दडविणार आहेस तू?

अपराध होतील त्यांचे किती
मोजण्या लिपिक उरशील तू!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९