एक आठवणीतील शाळाकवी प्रणव धायगुडे ( सहज एकदा एक लेखकाची शालेय जीवनावरील आधारित प

Started by Pranav dhaigude, December 13, 2015, 08:13:23 PM

Previous topic - Next topic

Pranav dhaigude


कवी प्रणव धायगुडे

( सहज एकदा एक लेखकाची शालेय जीवनावरील आधारित पुस्तक वाचत असताना मनात विचार आपणही बनवावि एखादी कविता......  तस मला शालेय जीवन जगुन खुप वर्षे लोटली तरीही काही आठवणी पुसटस्या अठवतात त्यावर आधारित मि एक कविता बनवली आहे )

एक आठवणीतील शाळा

आठवतिये मला ति आश्रम शाळा
जिथे होता शिक्षणाचा लळा
आणि शिक्षकांचा जिव्हाळा
अठवतोय मला तिथला तो फळा
असला जरी काळा
त्यानेच बांधल्या आमच्या भविष्याच्या नाळा

खुप चालायची आभ्यासामध्ये मुलामुलींची चढ़ाओढ़
त्यानेच खरी लागली आम्हाला अभ्यासाची ओढ़
एकमेकांना चिड़वायची आम्हाला होती खोड
अश्या चिडवन्याला असे अपशब्दांची ही जोड़

आमच्या वर्गात शिक्षकांची ही मूल खुप होती
त्यांची ही असे आमच्याशी अपुलकिचि नाती
काही तर तास बुडवायचा म्हणून घालवायच्या  Washroom मध्ये वेळ
कोणी नसेल वर्गावरती तर शाळेच्या पाठीमागुन काढायच्या पळ

शनिवार रविवार असे आमचा टीवी बघण्याकडे कल
त्यातूनही मानासारखा पिक्चर नाही लावला तर सर्वांची होत असे चलबीचल
जेवनाच्या वेळी  नसायचा चांगल्या पदार्थाचा हाव
जे मिळायच त्यावरच मरायचो आम्ही ताव

आई वडिलांपासून दूर राहून त्यांच्या मायेला असलो जरी मुकलो
आश्रम शाळेत राहून एकमेकांचे मन राखून जगायल शिकलो
खरच आंमची शाळा समतेची शिकवण द्यायची
कोवळ्या आमच्या मनांवरती मानुसकचे बीज रुजवायची

चुकलोच कधी तर खायचो सरांचे फटके
म्हणूनच तर आता आयुष्याच्या कठिन वळणावरती कमी बसतात चटके
क्रीड़ाक्षेत्रात आमच्या शाळेला नसायची कोनाची सर
आमची टीम पाहून भले भले कारायचे हाथ वर

भांडलेले ते क्षुल्लक क्षण आठवले की हसु येते
कधी खळखळुन हसलेले क्षण आठवले की आपसुकच रडू येते
अनुभवले मि तिथे अविस्मरणीय क्षण काही कडु तर काही मधाहुनही गोड
मला लागलिये आता पुनसा त्या मोहक क्षणांची  ओढ़