आयुष्यावर लिहायचे.

Started by sneha kukade, December 13, 2015, 08:57:44 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

आयुष्यावर लिहायचे ..आयुष्य काय असते ??
आयुष्य  हे दोन दिवस उमलून
गळुन पडणाऱ्या फूला प्रमाणे असते
.
.आयुष्य काय असते ??
स्वः जळून  दुसऱ्याना प्रकाशमान
करणाऱ्या वाती प्रमाणे असते   
.
.आयुष्य काय असते  ??
रणरणत्या उन्हात ताहणलेल्या चातका प्रमाणे असते
.
.आयुष्य काय असते ??
श्रावणाच्या रागाने वाहून गेलेल्या
चिमणीच्या घरटया प्रमाणे निरागस  असते

..आयुष्य काय असते ??
आयुष्य हे देवाचा मुर्ती प्रमाणे अबोल असते

..आयुष्य काय असते ??
आयुष्य हे सतत चालुन गंजुन
पडलेल्या इंजिना प्रमाणे असते
.
.आयुष्य काय असते ??
आयुष्य हे कधी नटलेल्या
फूलरानि प्रमाणे तर कधि अनाथांच्या डोळ्यांतील अश्रुप्रमाणे
नकोस वाटणार असते

..आयुष्य काय असते ??
आयुष्य हे आयुष्य असते
ते सगळ्याना जगायचं असत तर
कधी जगतां जगात मारायचा असते  !