* मी *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 14, 2015, 09:44:54 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


मी जितका समोरच्याला
कळत जातो
तितकाच त्याला अनोळखी
वाटु लागतो
मग तो मला ओळखण्याचा
प्रयत्न करु लागतो
परी त्यास मी क्षणोक्षणी
नवाच भासु लागतो
माझ्या रुपांच्या अथांग सागरी
तो गोते खाऊ लागतो
तळाशी येऊनही तो माञ
रिकाम्या हातीच परंतु लागतो.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938