maitricha nata

Started by yogitabs, December 16, 2015, 08:17:02 PM

Previous topic - Next topic

yogitabs

मैत्री असते एक अतूट नाते
जसे वाऱ्यावर डोलणारे गवताचे पाते
मैत्रीत किंमत नसते रागाला
हे समजावून सांग तू तुझ्या मनाला

मैत्रीत विचार द्यायचे नि घ्यायचे
पटत नसतील विचार तर
उगीच का भांडत बसायचे

मैत्रीचा हा धागा नाही तोडायचा आपल्याला
आपली मैत्री आपण दाखवून देऊ जगाला
मैत्री ठेऊ आपण आपली फुल आणि फुलपाखरासारखी
आयुष्यभर साथ देणारी

योगेश्वरी दिनकरराव जायभाये