aaicha nata

Started by yogitabs, December 16, 2015, 08:31:28 PM

Previous topic - Next topic

yogitabs

मांजर म्हणते तिच्या पहिल्या पिल्लाला
माफ कर माझ्या बाळा मला
तुझ्या छोट्या भावंडांसाठी मी
तुझा प्राण पणाला लावला

मी आहे वैरिणी पिल्लांची
समजूत आहे अशी लोकांची
पण नाही रे बाळा,
पर्वा नाही मला माझ्या प्राणांची

आईचं नातं नाही कळायचं तुला
तुला मारताना कसं झालं असेल मला
आई खरच नसते रे स्वार्थी
ती असते फक्त प्रेमळ अन निस्वार्थी
पण हे आताच नाही कळणार तुला
जावं लागेल त्यासाठी आईच्या जन्माला! 

योगेश्वरी दिनकरराव जायभाये