संपणार सर्व आता...

Started by Shri_Mech, December 17, 2015, 02:02:44 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

संपणार सर्व आता...

संपणार अशाच या गोष्टी,
ज्या जपलेल्या कधीकाळी प्राणपणाने...
जाणार विझून पणत्या लावलेल्या,
ज्या द्यायच्या उब मायेची...

नुसतं पहातच राहणं येईल वाट्याला अन्
हतबलता देत राहील टोचणी जिवाला...
पोकळ विचारात जो वेळ घालवला,
पश्चातापातून तो फेडावा लागला...

घडतील पापे हातून आपोआप,
सावरण्या पलिकडे जाईल सर्व व्याप...
आठवेल तो उजळ भूतकाळ,
लागेल मागे टाळलेल्या प्रश्नांची माळ...

मग अचानक एके दिवशी, उबगून या स्थितीला,

कोंडून टाकीन मी स्वतःला,
निरर्थक माणसांच्या गराड्यात...
विसरावे लागेल त्या दिवसांना,
जेव्हा होता माझा स्वच्छंदी विहार...

Shri_Mech
Shri_Mech