सबल

Started by pranaldongare, December 18, 2015, 09:30:29 AM

Previous topic - Next topic

pranaldongare

आम्हाला पाय नाहीत - नसु देत.
काही फरक पडत नाही!
आमच्या मनाची गती कायम आहे.

आम्ही अपंग जरुर आहोत.
मात्र - अगतिक नाही.
आमचा अभिमान अजून शाबूत आहे.

चार पावले चालायला,
आम्हाला कुबड्या जरूर लागतात.
मात्र आमचे मन?
ते आभाळभर फिरते,
कोणत्याही कुब्ड्याशिवाय, आधाराशिवाय.

तुमची खोटी सांत्वना, तुटपुंजी करुणा,
आणि कमकुवत सहाय्य.
कधीच नाकारले आहे आम्ही - अतिशय घृणेने!

तुमची भिक नको आहे आम्हाला,
आमच्या पायांवर उभे राहण्यासाठी.
आम्हाला फक्त एक प्रामाणिक संधी द्या,
तुमच्यात "तुमचे" म्हणून मिसळण्यासाठी.

-शार्दुल