आता उठलच पाहिजे

Started by Anandraj, December 19, 2015, 03:58:10 PM

Previous topic - Next topic

Anandraj

सूख हवे हवेसे वाटते
नशीबाने कुणा भेटते
आपल्याच दुक्खावर
अस रुसुन कस चालेल?
आता उठलच पाहीजे
अस बसुन कस चालेल?

आयुश्य हे अतुल्य
आहे त्याला फ़ार मूल्य
जीवन झीजवनारा दगड
असा घासून कसा चालेल?
आता उठलच पाहीजे
अस बसुन कस चालेल?

निशचय केला होता एक
आहेत विचार आपले नेक
मग स्वप्न अर्ध्या रसत्यात
अस सोडून कस चालेल?
आता उठलच पाहीजे
अस बसुन कस चालेल?

मार्ग असो कसाही
आनंद देइल तुला साथ
मनापसुन सांगतो तुला
एक लाख मोलाची बात
आपन रंगवलेल्या दुनियेत
सोबत नसुन कस चालेल?
आता उठलच पाहीजे
अस बसुन कस चालेल?

                 --"आनंदराज"
आनंदराज