काहितरी राहुन गेल

Started by Anandraj, December 19, 2015, 04:02:22 PM

Previous topic - Next topic

Anandraj

* काहितरी राहुन गेल....*

चालता चालता एकदा सहज,
मागे वलुन पाहिल...
खुप पुढे निघुन आलो,
जग मागे राहिल...
दुर निघुन आल्यवर,
स्वप्न सोबतिच पाही..
काहितरी राहुन गेल,
बाकी काही नाही....1

वेल निघायची होती
पाय चालत नव्ह्ते..
समोर सग्लेच होते
कोनिच बोलत नव्ह्ते..
शरीर निघुन गेल
मन घरिच राही..
काहितरी राहुन गेल,
बाकी काही नाही....2

काल होता प्रेमाचा
तेव्हा व्यक्त नाही केल..
आज वेल निघुन गेलि
मन कासावीस झाल..
ती सोबत असती आज
तेव्हा बोल्लो असतो काही.
काहितरी राहुन गेल,
बाकी काही नाही...3

दिवस सरत गेले
वय वाढत गेले...
आयुश्याच्या सरत्या शेवटी
मग लक्षात आले..
सुंदर होत बालपन
मागे डोकावुन पाहि...
काहितरी राहुन गेल,
बाकी काही नाही...4

विसरुन जा आता
झाल गेल काही...
नवीन सुरुवात करु
स्वप्न उद्याच पाहि..
मैत्री प्रेमा सोबत
मग आनंदाने राही...
मग सगल काही होईल
बाकी राहनार नाही काही..

                -- "आनंदराज"
आनंदराज