मी विसरुन कस जाऊ?

Started by Anandraj, December 21, 2015, 03:25:51 PM

Previous topic - Next topic

Anandraj

लहानाचे मोठे झालो
वय हे वाढत गेल..
प्रेमापाठी धावत गेलो
हाती काही नाही आल..
सगल काही जुनच आहे
नवीन नजरेने कस पाहू?
तुच सांग मित्रा आता
सगल विसरुन कस जाऊ?

दिवस किती महीने गेले
वर्ष ही किती सरुन गेले
आधी तर जखम होती
नन्तर दुखने वढत गेले
तुच सांग मित्रा आता
मलम कुठ्ला लाऊ?
मी विसरुन कस जाऊ?

काही दिवस सुरवातीचे
सगल काही बर होत
माझी मैत्री खरी आहे
माझ प्रेम ही खर होत
माझ्या स्वताच्या चितेला
मी आग कशी लाऊ?
तुच सांग मित्रा आता
सगल विसरुन कस जाऊ?

खूप प्रयत्न केले मी
तिने समजुन नाही घेतल
काही जवलचे लोक होते
ज्यानी आगित तेल ओतल
समझनारा फक्त आहेस तू
मित्र माझा तुच माझा भाऊ
तुच सांग मित्रा आता
सगल विसरुन कस जाऊ?
                    --"आनंदराज"
आनंदराज