नका करू गर्भपात

Started by Dineshdada, December 21, 2015, 03:45:12 PM

Previous topic - Next topic

Dineshdada

अरे मानसा तुजी कोणती रे अशी जात
मुला साठी मुलीचा का करतो गर्भपात||
तिच्या पावली अखंड लक्ष्मी येई घरात
सुख लागेल अखंड तुझ्या घर प्रपंचात||
अरे मानसा तुझी कोणती रे अशी जात
किती करशील सांग आता पाप अंधारात||
मागशील किती सांग आता सुख मंदिरात
करुनि खोटे काम असे जाशील नरकात||
वाढूदे रे ती मुलगी त्या आईच्या उदरात
अरे मानसा तुझी कोणती रे अशी जात||