*** पिरेम आमच्यात कमी न्हाय ***

Started by धनराज होवाळ, December 22, 2015, 09:21:11 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

एका गरीब दांपत्याची कहानी मी माझ्या या कवितेतून व्यक्त करत आहे...
कविता आवडल्यास कवीच्या नावासहित पुढे फॉरवर्ड करावी...

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

👪 पिरेम आमच्यात कमी न्हाय 👪

गरीबाघरचा जोड आमचा,
पिरेम आमच्यात कमी न्हाय..
जरी भांडलो लटकं तुटकं,
एकमेकांशिवाय करमत न्हाय..!!

नसंल पैका भागवन्या गरजा,
तरी कष्ट बी आमचं कमी न्हाय..
राबवुन घितुय मुकदम आमचा,
क्षणभर बी जीवास आराम न्हाय..!!

हाय गावाकडं जिमीन माझी,
पर शेतात पाण्याचा थेंब न्हाय..
कर्जाचा डोंगर हाय डोक्यावर,
आता कष्टाशिवाय पर्याय न्हाय..!!

माझ्या बानं फास लावला हुता,
पण म्या कधी लावणार न्हाय..
रात्रं-दिन राब राब राबुन मला,
माझ्या लेकरांना शिकवायचं हाय..!!

आरं हु दी माझ्याव कर्जाचा डोंगर,
लेकरांना म्या साहीब करणार हाय...
मग त्यो फिडील कर्ज समद्यांचं,
कारण...
पिरेम आमच्यात कमी न्हाय...
पिरेम आमच्यात कमी न्हाय...!!!
-
स्वलिखित...
👼🏼 धनराज होवाळ 👼🏼
पलुस, जि. सांगली
मो. ९९७०६७९९४९
👪🙏🏻👪🙏🏻👪🙏🏻👪🙏🏻👪