स्वप्नांची साउली

Started by varuna, December 22, 2015, 11:46:26 AM

Previous topic - Next topic

varuna


गोऱ्या गोऱ्या स्वप्नांची
सावळीशी साउली,

आठवे सारखी आता
हातातली बाहुली।।

अनोळखे परि, जग होते सोबती
रित ना कशाची,

आता ओळख साऱ्यांशी
तरी अडखळते पाऊल प्रत्येक उंबऱ्याशी।।
वरुणा पाटील