कथा

Started by Dnyaneshwar Musale, December 22, 2015, 09:52:38 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

पिकलं हे पान गजाआड गेली नाती
आधारास कशी पेटवु आता ज्योती
तुझ्यासाठीच  कष्टाने हे बांधले रे घर
लेका आता आई बापालाच  नको दूर .

जन्मताना रघताने भरला पदर
ओठांतल्या दुधाचीच नाय तुला आता कदर
बापाच्या घामाची नाही उरली सर
लेका आता आई बापालाच असा नको दूर .

हाताने भरू घातली रे तुला साखर
अर्ध्या घासाची जड होते तुला आई बापाची भाकर
कॉलेजात पार्ट्यामधले जवळचे झाले  मित्र
बापाच्या पैशावरच संपले रे तुझे  पहिले सत्र
आई बापाच्या नावाचे जणु अनोळखी झाले स्वर
लेका आता आई बापालाच असा नको करू दूर .

अंधारतल्या जखमा नाय बघु दिल्या तुला
याच हाताने हलवला रे तुझा पाळण्याचा झुला
स्वप्नातही पाहिलं ढगा पलीकडचं आभाळ
उघड्या डोळ्याने बघतोय  जळणार आयुष्याचं गबाळ
कुजलेल्या आठवणींना येतो रोजच पूर
दमलेल्या आई बापाला लेका असा नको करू दूर .

तु झाला असशील तुझ्या बायका पोरांचा भक्त
पण कधीतरी आम्हा म्हणत जा आई बाबा फक्त
रस्ता चुकलेल्या पाखरांसारखी नको बनवु व्यथा
पाण्याचा बुडबुडा आहे संपुन जाईल रे एक दिवस                 
                                            आमची कथा ।।

                                             8796454156