जीवन

Started by Vikas Vilas Deo, December 23, 2015, 09:28:11 AM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

जीवनात कधी कधी
अश्रूंच्या वाहतात  धारा
जीवनात कधी कधी
हासवांच्या पडतात गारा

जीवनात कधी कधी
दु:खाचा समोर असतो सागर
जीवनात कधी कधी
सुखाने भरलेली दिसते घागर

जीवनात कधी कधी
कष्टाच्याआगीत होरपळावे
जीवनात कधी कधी
आरामाच्या खुशीत निजावे

जीवनात कधी कधी
निराशेचा येतो घोर अंधकार
जीवनात कधी कधी
आशेचा लख्ख प्रकाश असतो फार

जीवन हे सुख-दु:ख, आशा-निराशायाचाच सारा खेळ आहे
जीवन म्हणजे अजून काय असणार
जीवन म्हणजे सुख दु:खाचा मेळ आहे.