रडगाणे

Started by Vikas Vilas Deo, December 23, 2015, 09:42:44 AM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

रडगाणी
येथे सर्वांचेच वेगवेगळे रडगाणे
जीवन म्हणजे जणू रडतच रहाणे

कोणी रडतो पैशासाठी
कोणी पैसा आहे म्हणून रडतो
कोणी रडतो मुलासाठी
कोणी मुलामुळे रडतो
. . .  . .  . सदा सर्वदा रडतच जाणे

कोणी रडतो शिक्षणासाठी
कोणी शिकल्यामूळे रडतो
कोणी रडतो  जगण्यासाठी
कोणी जगाव लागते म्हणून रडतो
. . . . . . . .येथे रडता रडता जगणे रडता रडता मरणे

कोणी रडतो सुखासाठी
कोणी अति सुखामुळे रडतो
कोणी रडतो खाण्यासाठी
कोणी अति खाल्ल्यामुळे रडतो
. . . . . . . .  रडण्याशिवाय दुसरे अशक्य येथे दिसणे

कोणी रडतो मरण्यासाठी
कोणी मेल्यामुळे रडतो
कोणी रडायचेय म्हणून रडतो
कोणी रडता येत नाही म्हणून रडतो
. . . . . . . . . रडणे जणू हे नशीबाचेच देणे