मी नाही त्यातली , कडी लावा आतली

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, December 23, 2015, 01:25:26 PM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

मी नाही त्यातली
कडी लावा आतली

मला हे इलेक्शन
जिंकायचं आहे
पुन्हा एकदा गरिबाच्या थाळीत,
शिंकायचं आहे
काय करु मंत्री मी
मला सर्दि लय दाटली
मी नाही त्यातली
दादा कडी लावा आतली

मी चोर नाही
शाव आहे
गरिबाच्या मानेवरती
माझाच चोरटा
घाव आहे
माझाच होता माणूस तो
ज्याने तुमची मान काटली
मी नाही त्यातली
दादा कडी लावा आतली

माझी बायको लय मस्त
जी श्रृंगाराने थाटली
तिला सोन्याची हाव नाही
पण आवडते पाटली
मी नाही त्यातली
दादा कडी लावा आतली.

crited by, Narayan Mahale
02/10/2014 5:19AM
Narayan Mahale
त्याच्या प्रेयसिचं गाव

जगावेळं होतं
त्याच्या प्रेयसीचं गाव
प्रत्येकाच्या ओठांवर
ज्याचं खेळत होतं नाव

गजबजून उठत होती
गाव आणी गल्ली
ईलेक्शनच्या वेळी तर
मजा होती भल्ली
दारु धोतरात घालताच
जिथे गुलाम बणतो राव
जगावेगळं होतं त्याच्या प्रेयसिचं गाव.

ना-विन्याचं नाव नाही
रा-त्र होताच येथे
य-कही शाव नाही
न-सतो कधीच बंद येथे
  जुगाराचा डाव
जगावेगळं होतं त्याच्या
प्रेयसिचं गाव

म-सणाच्या वाटेवर
   व्यसणाच्या खाटेवर
हा-ल हाल होऊन गेले
ले-करासकट राव
जगावेगळं होतं
त्याच्या प्रेयसिचं गाव.