प्रेमाच्या या वचनाचा , हा चंद्र आहे न साक्षीला...

Started by Poonam chand varma, December 24, 2015, 10:07:19 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

कसे सांगू मी तुला, भावना माझ्या हृदयातल्या
माझ्या प्रेमळ विचारांचा , चंद्र आहे ना साक्षीला...

हरवून गेलो तुझ्यात , बघून प्रेत्येक क्षणाला
कसे विसरून गेलो जग सारे, याचे चंद्र आहे न साक्षीला...

तुझ्या सोबत चालतांना , नकळत स्पर्श बोटांचा
प्रफुल्ल्तीत किती झालो मी, याचा चंद्र आहे न साक्षीला...

आश्रू तुझ्या हृदयातले , जोपासले मनाच्या शिंपित
मनाचा श्रीमंती किती या मोत्यांमुळे , याचे चंद्र आहे न साक्षीला...

माझ्या भावनेच्या अंकुरांना , नीर दिले मी प्रेमातले
विशाल प्रेम वृक्ष झाले कसे, याचे चंद्र आहे न साक्षीला...

या प्रेम वृक्षाच्या सावलीत , आनंदी ठेवीन जीवनभर
प्रेमाच्या या वचनाचा , हा चंद्र आहे न साक्षीला...


@ Poonam chand Varma  :)
@ Poonamchand V