माझ्या आठवणींतला श्याम

Started by सागर बिसेन, December 24, 2015, 09:03:43 PM

Previous topic - Next topic

सागर बिसेन

📝माझ्या आठवणींतला श्याम🙏🏼

श्याम!
माफ कर मला जरा एकेरी बोलतोय,
कदाचित राग येईल तुला,
गुरू आहेस तू सर्वांचा,
मात्र आजतरी श्याम बोलू दे मला।
या एकेरीपणात आपुलकी वाटते,
मनात तुझ्या कथांचे जग दाटते।।

श्याम!
वाचलंय रे मी तुझ्या कथा अन लिखाण,
मीच नाही तर इतरांनी पण..
किती अतूट ते नाते तुझे,
श्याम म्हटलं कि मुखात 'आई' तयारच..
रडवलंस रे तू मला, 'श्यामची आई' वाचताना,
अनं इतरही खूप रडले आणि रडतील.
तुझ्या लिखाणाचे गोडवे पुढेही गातील।।

श्याम,
तुला वाचताना तुझी आई दिसायची,
नकळतच नयनांत पाणी येऊन,
मग मला माझी आई आठवायची।
आमचीही आई करते रे तितकंच प्रेम आमच्यावर,
जितकं तुझी आई तुला करायची।
मात्र तू लिहिलंस, तिला जपलंस शब्दांमध्ये,
अनं आमची हिंमतच नाही होत लिहायची।।

श्याम,
धन्य आहेस रे तू अनं तुझी ती माऊली,
लोकांना आईचं प्रेम दाखवलंस,
अन स्वतः गुरुजी होऊन इतरांना शिकवलंस।।
मलाही आठवते माझी आई आता,
स्वप्न आहे आपणही तिच्यावर लिहायचे,
मात्र तुझ्याइतके नाही रे मला जमायचे।।

श्याम!
निमित्त म्हणून काय ते जाऊदे,
मात्र मला तुझ्यावर लिहायचे होते।
तुझ्या आईचे प्रेम इतरांना दाखवायचे होते।।
प्रत्येकाला अशीच आई लाभो,
आणि त्या प्रत्येक माऊलीला तुझ्यासारखा श्याम...
मनापासून करतोय तिला मी सलाम।।

श्याम!
जरी तुझ्याइतका नसलो मी,
तरी थोडक्यात का होईना येईल लिहिता।
तुझ्या आठवणीतच हे सारं मी ओतलाय,
जगण्याचं नवं संकल्प मी घेतलंय।।
वाचणार रे अजून तुला लोक, चिरंतन तुझे लिखाण.
पाणावलेले डोळे आणि त्यात आईच्या आठवणी,
तुझ्यासाठी मी लिहिलेली हीच शब्दांची पाठवणी।।

श्याम,
तुझा काळ वेगळा होता,
आणि आता नकली हा आमचा काळ,
इथे विसरलेत रे माणसे माणसांना,
काय ती साहित्याची तमा असणार लोकांना।
तरीही जपल्यात मी मात्र तुझ्या कथा,
देतात शब्द ते तुझे आनंद मज जाम।
अशातऱ्हेने जपलाय मी माझ्या 'आठवणींतला श्याम'।।
 
©सागर बिसेन
9403824566
२४/१२/२०१५