# आजकाल तू पाहत नाहीस #

Started by radhe92, December 24, 2015, 10:53:54 PM

Previous topic - Next topic

radhe92

                        #  आजकाल तू पाहत नाहीस  #

कधीतरी भेट होते
पण आजकाल तू पाहत पण नाहीस
हिरमुसलेल्या तोंडाने
नजर झुकवून
तू अशीच निघून जातीस .......... 

आजकाल तू पाहत नाहीस
मीच एकटा पाहत बसतो
बरसावे माझ्यासाठी दोन अश्रु
तुझ्या डोळ्यांसाठी मी चातक होतो..........   

साथ नको आहे सातजन्मी
या  जन्मी फक्त हात दे
नाही पडेल लग्नगाठ चालेल
मरेपर्यंत फक्त श्वास दे .......... 

आजकाल उन्हाळयात  ही
भरगच्च पाऊस पडतो
त्या पावसात हि मी
फक्त तुझेच अश्रू  शोधत असतो .......... 

बघ ,
परवाच तुझी भेट झाली
तुही समोर आली
मी भूतकाळाच्या आठवणीत हारवलो
तुला  आवाज देतांना
मी ही क्षणभर थरथरलो
त्या सांजवेळी तू
सौंदर्याने खुलेलेली
विसरून तू मला
आपलयाच मार्गे सरलेली .......... 

-संदिप बैलकर