* सत्ताधारी *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 24, 2015, 11:33:36 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


असुनी कोट्यावधीची मालमत्ता
या खासदारांचीच सत्ता
उपाशी मरतोय शेतकरी
अन वाढवा यांचा पगारभत्ता

सोडत नाही स्वता
बंगला गाडी
अन आम्हाला म्हणे
सोडा तुम्ही गैस सबसिडी

नेमकं गरीब कोण
याचच पडलंय कोडं
कितीही खाल्ल तरी
यांना वाटतय थोडं

जनता फोडतेय टाहो
खुशाल फोडु दे
दोन अश्रुं ढाळुन
मला मत मागु दे

जनता मरु दे
सत्ताधारी जगु दे
विकासाच्या नावाखाली मला
पोट भरु दे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938