दत्त दिगंबर रूप

Started by विक्रांत, December 25, 2015, 06:42:24 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

दत्त दिगंबर रूप
सखी मज आवडते
अन स्मरता तयास
हृदयी हुरहूरते

यावा पुनवेस जैसा
उचंबळून सागर
वादळात उडावे वा
शुष्क पर्ण सैरभैर

गत तैसी माझी होते
मन देहापार जाते
भान अलखी रंगते
मी माझी मुळी नुरते 

मी होवून कवडसा
सारे आभाळ भरते
मी थेंबागत झरुनी
हे विश्वची सजविते   

मी चांदण्यात नटते
मी वाऱ्यात हरवते
मी म्हणू मला कुठले
ते रूप सखी हे होते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/