छोटसं घर

Started by Dnyaneshwar Musale, December 25, 2015, 09:29:48 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

               
आठवणींचं घर असतं
त्याला प्रेमाचं दार असतं
आजीचं देवघर असतं
मायेचा पाझर असतं.

आईची ती माया असते
वात्सल्याची खान असते
बापाची छाया असते
खेळण्याचे ते मैदान असते .

भावाची ती वात असते
जीवनभर तेवत असते
बहिणीची लया असते
काळजाची दया असते .

बायकोचा तो हात असतो
आयुष्यभर तो साथ असतो
पोरांचे ते अंगण असते
प्रेमाचे ते नंदवन असते .

घर हे घरचं नसतं
फुला मधला मकरंद असतं
वाटल्याने वाढत असतं
एकमेकांना प्रेमाने जोडत असतं.
                                 8796454156