क्षितिज

Started by Csushant, December 26, 2015, 07:52:52 PM

Previous topic - Next topic

Csushant

क्षितिज

मन वेडे क्षितिजाची त्याला आस,
जरी ठाव,
हा तर केवळ द्रुष्टीभास!

मन स्वप्नाळू पाहते आकाशाचे धरेशी मिलन,
हलकेच झुकून,
जणू घेई भाळी चुंबन!

मन जिद्दी अशक्याची त्याला ओढ,
घेई क्षितीजाकडे धाव,
पाहून झुकलेल्या आसमंतास!

मावळतीच्या किरणात मनात एकच हुरहुर,
याच क्षितीजावर,
पावतो अस्त स्वप्नांचा सूर्य!

हे क्षितिज तर असते,
बुद्धीला पटणारी अशक्यता,
अन् मनाला वाटणारी आशा!!!

- C. Sushant