स्मृतीगंध

Started by श्री. प्रकाश साळवी, December 26, 2015, 09:52:58 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

स्मृतीगंध
जागविले तुझ्या स्मृतिने
शब्द शब्द फुल झाले
प्रितस रंग आले अन्
सुगंधात मी न्हाऊन गेले
बहाणे जूने पुराणे
स्पर्शास ऊमलून गेले
तुझ्या जाणिवेने मज
हृदयी धुंद-गंध झाले
हसण्यात जणू होती
काही जादू निराळी
मी तोडून बंध सारे
जीवन ऊधळीत आले
मज ऊमगलेच नाही
हे मी काय केले
मूकपणे मी मजला
तुझिया स्वाधिन केले
यज्ञात आहूतीला मी
जिवन माझे अर्पिले
होमात तुझ्यासह
मी यज्ञकुंड होऊन गेले

श्री.प्रकाश साळवी