विनवणी

Started by श्री. प्रकाश साळवी, December 27, 2015, 12:32:50 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

विनवणी
का रे नाठवे हे गोड तुझे रूप
गोड तुझे नाम मुखी ना ये ।
मायावी हे जग तरी ओढ त्याची
का न जाणे मर्म मन माझे ।
फसवी ही नाती तरीही अवीट
का न लागे ओढ तव नामी ।
ऐसे काही करी ओढ लागो तुझी
विनवणी ही माझी ऐक देवा ।
तु कृपाळू कनवाळू माझी माय
पुरवावी आस एवढी माझी ।।

श्री. प्रकाश साळवी