विठूरायाची नगरी

Started by श्री. प्रकाश साळवी, December 27, 2015, 12:39:33 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

विठूरायाची नगरी
पहा पहा रे पंढरी
विठूरायाची नगरी
पहा पहा रे सुखे
विठूरायाचे रूप
चंद्रभागे करा स्नान
निर्मळ करा तन मन
सावळी ही कांती
मन लावा रे परमार्थी
चाले विठ्ठलाचा गजर
अविट सोहळा अपरंपार
याहून काय हो सुख
या भूलोकीचे स्वर्ग सुख
आयुष्यासी यावे यावे
तरी एकदा पंढरीसी जावे

श्री. प्रकाश साळवी