अंगण

Started by Dnyaneshwar Musale, December 28, 2015, 07:54:22 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale


अंगणातली रांगोळी
फ्लॅट मध्ये घुसली
शेन सड्याची मात्र
काळजीच मिटली .

वृदांवनातली तुळशी
कुंडीत येऊन बसली
हळदी कुंकवाची
सवय मात्र सुटली .

अंगणातील बालपण आणि
गेले सारे सूर
दिसणारा चांदोबा ही
गेला खुप दूर.

दारावरचं तोरण
हळु हळु मिटलं
उघडलेलं दार मात्र
हळुच कोणी तरी लोटलं.