प्रयास

Started by avi4u.iitkgp, December 28, 2015, 10:52:15 PM

Previous topic - Next topic

avi4u.iitkgp


# प्रयास

(काल पोस्ट केलीली कविता ‪#‎वीट‬ , ही प्रियेसीच्या च्या नजरेने होती , आजची ‪#‎प्रयास‬ ,ही कविता प्रियकराच उत्तर ...).

तू जानारस होतीस , अन जाशीलही ,
मला राग आलाय , मी सालस असल्याचा

तुला माहितेय, मी प्रयास सोडला नव्हता ...... .माफी मागण्यात मी कच्चा आहे
तुला माहितेय , मी हटहास सोडला नव्हता....... कदाचीत देव तरी इथं सच्चा आहे

मला माहितेय ... कि तुला माहितेय ,
मी एकदा नाही ... चूक दोनदा केलीये
अन दोनदा नाही ...चूक तीनदा केलीये
अन तीनदा नाही.... चूक शंभरदा केलीये

म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये .... माझ्या चुकांना सुधारायची
म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये .... तु स्वीकारलेल्या माफीची

इतका उशीर झालाय का माफ करायला ?
इतका उशीर झालाय का चुकांना सावरायला ?
याद सतावते तुझी , ना फ़क्त तुझ्या देहाची
मीच ना तो ज्यान ,वाट लावली तुझ्या स्वप्नांची

सारा दोष दे मला , पण माझी पुन्हा होते का ?
माहितेय तुला , टाळी एका हाताने वाजते का ?

पुन्हा पुन्हा येयील मी , ह्र्याद्याला तथ्य सांगीन मी ,
पुन्हा पुन्हा जाशील तू , ह्र्याद्याला सत्य सांग तू ....

इतका उशीर झालाय का माफ करायला ?
इतका उशीर झालाय का चुकांना सावरायला ?
याद सतावते तुझी , ना फ़क्त तुझ्या देहाची
मीच ना तो ज्यान ,वाट लावली तुझ्या स्वप्नांची

MK ADMIN

Excellent. Keep posting more poems. Aweosme aahe..