मध

Started by avi4u.iitkgp, December 28, 2015, 11:30:34 PM

Previous topic - Next topic

avi4u.iitkgp


तुझी गुलाबी  मखमल हवीये ,
मखमलितला गोड मध हवाय
अनानामिका ला नको देउस ,
जोपर्यंत तो अनामिक मी असेन

उचकी  लागलिय  प्रिये ,मोड्लोय पुरता
प्रणयी वात्सल्य  हवय , हवय आता 
तुझ्याबिगर असतो मी जेव्हा ,
दीन दुबळा असतो  मी तेव्हा

मला तुझ्या प्रेमाची जरुरी नाही ,
फक्त तुझ्या प्रेमाची खोली हवी
घातकी वाटतो दुरावा तुझा
तुझ्याशिवाय श्वाश नाही माझा

पर्वा नाही मला  कुठ्येस तू ,
फक्त तुझ्याजवळ हवाय मी 
अन हवाय तुझ्या प्रेमाचा स्वाद ,
तू माझ्यात न मी तुझ्यात आत

नाही का ओढ्नारेस तू मला ,
इथेच मी , तुझ परिस  दे मला
हो , तूच मला जगवलय
प्रेमाचा मध तूच पाजलंय

माझे तुटलेले तुकडे ,
तूच जूळवलेस
तुटलेला तोडून जाऊ नकोस
मध प्रेमाचा सांडू नकोस

असुरक्षित तुझ्याविना ,असतो  मी ,
फक्त तूच, जिच्यासाठी जगतो मी ,
थोड्या गोडव्याची ,गरज माझ्या जीवाला ,
तुझ्या प्रेमाच्या मधाची ,आस हृदयाला

मला नाही खेळायचा कोणता खेळ ,
तुझ्यात माझा बसू दे मेळ ,
तर मनात का तुझ्या कालवाकालव
ह्रदयात का तुझ्या हलवाहलव ...

तुझी गुलाबी  मखमल हवीये ,
मखमलितला गोड मध हवाय
अनानामिका ला नको देउस ,
जोपर्यंत तो अनामिक मी असेन







विकास मौंदेकर

नाराज हो हमसे,तो सज़ा दो हमें।
पर आपकी इस ख़ामोशी से, हर पल तड़पाओ मत हमें।

विकास मौंदेकर

नाराज हो हमसे,तो सज़ा दो हमें।
पर आपकी इस ख़ामोशी से, हर पल तड़पाओ मत हमें।

विकास मौंदेकर