गेले दिस ते जुने सारे

Started by सागर बिसेन, December 29, 2015, 11:46:25 AM

Previous topic - Next topic

सागर बिसेन

गेले दिस ते जुने सारे...

स्वागत कराया मी उभा इथे, नवे सूर्य जणू उगवले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

केलेले संकल्प बघा तुम्ही, आता कुठे ते हरपले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

काही संपले येऊनी पूर्णत्वास, काही वाटेतच गडप झाले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

बांधलेले स्वप्न मनी बघितले काही, अर्धवट काही उरले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

सोडुनी वाईट ते दिवस, बांधून आठवणींत जे घडले चांगले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

करा संकल्प नवा जणांनो, टाका सुरुवातीचे  पाऊल पहिले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

देऊनीया आभार सर्वांना, जे सुख दुःखात शामिल झाले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

बघितले सारे हास्य होते, असेच असावे आनंदात आपले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

धीर द्यावयास मी सोबतीला, जिथे आपले आहेत रुसलेले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।

करुनिया नवे संकल्प उद्याचे, प्रवासाचे रस्ते नवे उघडले।
गेले दिस ते जुने सारे, आता बघा नवे आले।।
आता बघा नवे आले, आता बघा नवे आले....

©सागर
9403824566