समता

Started by avi4u.iitkgp, December 29, 2015, 05:01:44 PM

Previous topic - Next topic

avi4u.iitkgp

#समता

प्रियेसी बरोबर गेलो मी तिच्या घरी ,
पोहोचण्या आधीच होती जातीची दरी
'जात काय ह्याची -  त्यांनी तिला  विचारल
दलित ,  सवर्ण - समतेच ज्ञान मी पाझरल

[ ते ]

अद्भुत तेवर विश्वास आहे आमचा  ,
पण चमत्कार फक्त विसरायचा
'जात' नाही ती 'जात'असते  पोरा   
'वैरी ' नाही करायचा  समाज  सारा

'फळा'पुसला कि समानतेलाही इथं पुसतो  ,
'आंतरजातीय विवाह' सगळ्यांनाच इथं  सलतो
पण ,जे झालं ते आता 'चार भिंतीत' इथं विसरायचं ,
अन , आपण 'सगळे समान' असच बाहेर बोलायचं

[मी ]

ह्या 'सैतानाचा' आता कंटाळा आलाय ,
ह्या 'ठासण्याचा' आता कंटाळा आलाय
ह्या 'व्यापाराचा' आता कंटाळा आलाय
फक्त 'फायदाच 'काय तो 'प्राधान्य' झालाय

कावराबावरा नाही झालो ,मी तुमच्यामुळे ,
कावराबावरा नाही झालो ,मी तुमच्या बंदीमुळे
कावराबावरा नाही झालो , मी कुणा मुळेच
प्रिये , पण सगळा हे होतंय ते स्वार्था मुळेच

[माझं मन ]

जाती ,धर्मासाठी वरचढ  करता कशाला ?
माणुसकीची 'शोकयात्रा' मिरवता कशाला ?
ही कुजलेली युद्धे खेळता कशाला ?
स्वार्थासाठी  देशाला 'पुरता' कशाला ?

तुमचं रक्त आलाय कुठून अन कशासाठी ?
रक्तरंग एक आहे ,नाही माणसाला मारण्यासाठी ?
चमकणार हि  अंधुक झालेले ,  बघितलय मी ,
जातीयतेच्या आणीबाणीत , सडवनार  नाही  मी ,

बोलू नका कि माझं बोलण पटतंय तुम्हाला ,
तुमच्या डोळ्यानेच  लाथाडली मळ मला
पण ,जे झालं ते इथं आता चार भिंतीत विसरायचं ,
अन , आपण सगळे समान असच बाहेर बोलायचं