ओसाड झाड

Started by smadye, December 29, 2015, 09:39:46 PM

Previous topic - Next topic

smadye

ओसाड झाड

एक झाले होते ओसाड झाड 
हरवली पालवी गेली त्याची शान
फक्त फांद्या पसरलेल्या विस्तीर्ण
झाले होते दिसणे भयाण

झाडाची पालवी कुठे हरवली
एरवी बहरलेली ओसाड का झाली
नाही फुले, पाने आणि गाणारे  पक्षी
अवकळा तुला आली हि कशी

झाड म्हणे काय सांगू मी गाऱ्हाणे
बहार्लेलो तेव्हा कसलेच नव्हते उणे
फुलापानांनी मी सजलो'
पाखरांच्या गाण्यांनी होतो भिजलो

पण काळ असा एक आला
माझी पाने फुले लागली गळायला
उरलो मी फक्त विस्तीर्ण फांद्यात
बहरलेले दिवस आता मला आठवतात

खरच असते का असे जगणे
सुखात  असते सगळ्यांचे येणे जाणे
पण अवकळा काय आली
पाखरेसुद्धा  नाही फिरकली

आता मी ओसाड एकटा
कोणी नाही माझ्या साथीला
आता फक्त वाट बघावी
कधी फुटेल मला नवी पालवी

  सौ सुप्रिया समीर मडये