खंत..

Started by Pravin Raghunath Kale, December 30, 2015, 12:42:11 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

खंत

रात्र काळोखी, शांत, निशब्द
अगदी निर्जीव देहासम...
चंद्र शीतल, अबोल,
जणू हरवलेल्या शब्दासम...

रात्रीचा चंद्र, अन् चंद्राची रात्र
जणू शब्द माझे, अन् मी शब्दाचा,
दोन्हीही एकच जणू मात्र
सहवास तुटतो कधी एकमेकांचा...

काळोख पसरतो चंद्राविन रात्री
अंधार दाटतो शब्दाविना मनी,
शब्दाविन ओसरल्या कित्येक रात्री
शब्द हरवल्याची खंत तशीच मनी...

      ~~प्रविण रघुनाथ काळे
मो. 830873007
Www.facebook.com/kalepravinr