नको देह मानवाचा

Started by Dineshdada, December 30, 2015, 01:54:29 PM

Previous topic - Next topic

Dineshdada

नको रे परमेश्वरा मजला जन्म असा माणवाचा
दुसऱ्या साठी वाइट चितून सभ्य बनून राहन्याचा||$||
चालेल मिळाला जन्म,गल्लित वावरणार्या कुत्र्याचा
स्वभाव त्याचा नेक,ईमानदार राहन्याचा
भाकरीच्या तुकड्या साठी कर्त्तव्यशील राहन्याचा
नको रे परमेश्वरा मजला जन्म असा माणवाचा
दुसऱ्या साठी वाइट चितून सभ्य बनून राहन्याचा ||$||
चालेल मिळाला जन्म तो आकाशात उडणाऱ्या पक्ष्याचा
ठेऊन विश्वास स्वतावर्ती उंच भरारी घेण्याचा
स्वतःहा राहुन उपाशी संभाळ करती पिल्लाचा
नको रे परमेश्वरा मजला जन्म असा माणवाचा||$||
चालेल मिळाला जन्म,कीड़ा आणि मुंगीचा
वारुळात राहूनी एक जूठ साठा करती अन्नाचा
एका पाठी एक चालती,साथ देती सगळ्याचा
नको रे परमेश्वरा मजला जन्म असा माणवाचा
दुसऱ्या साठी वाइट चितून सभ्य बनून राहन्याचा||$||
चालेल मिळाला जन्म,शेतात राबणाऱ्या बैलाचा
पाठीवर्ती ओढूंन ओझे,बी बियान पेरण्याचा
ताठ करुनि मान आपली,डौलत डौलत जगण्याचा
नको रे परमेश्वरा मजला जन्म असा माणवाचा
दुसऱ्या साठी वाइट चितून सभ्य बनून राहन्याचा||$||
चालेल मिळाला जन्म,मातीत लोळणाऱ्या गाढ़वाचा
जीवनभर ओझे दुसऱ्याचे,आपले म्हणून ओढण्याचा
करुनी काबाड़ कष्ठ सार,मालका साठी जगण्याचा
नको  हे परमेश्वरा जन्म असा माणवाचा
दुसऱ्या साठी वाइट चितून सभ्य बनून राहन्याचा||$||
लेखक-दिनेश दिलीप पलंगे