काय यालाच प्रेम म्हणावं

Started by Vikas Vilas Deo, December 30, 2015, 08:04:53 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

कधी हसवं कधी रडावं
काय यालाच प्रेम म्हणावं

जगता जगता मरावं 
मरत मरत जगावं
तिच्यासाठी जगावं
तिच्यासाठी मरावं
       काय यालाच प्रेम म्हणावं

तिच्यासोबत बोलण्यासाठी
नेहमी मनाने तडफडावं
अन् बोलायला गेल्यावर
एक वाक्यही न सुचावं
       काय यालाच प्रेम म्हणावं

प्रत्येक चेहर्‍यात
तीचच प्रतिबिंब दिसावं
समोर नसतांनाही
फक्त तिलाच पहावं
        काय यालाच प्रेम म्हणावं

घेवून पेन कागद
अस वाटतं सार लिहावं
पण लिहायला बसल्यावर
काय लिहावं, हेच न सुचावं
       काय यालाच प्रेम म्हणावं