काय देवा माझी अशी चूक झाली

Started by Vikas Vilas Deo, December 30, 2015, 08:15:56 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

काय देवा माझी अशी चूक झाली
माझी आई मला पहाया न मिळाली ll


काय अपराध केला? काय केला गुन्हा ?
का घेतले हिवुनी जेव्हा मी होता तान्हा?
ना अनुभवया मिळाला आईच्या वाटसल्याचा पान्हा
आईच्या प्रेमाची गोडी न चाखाया मिळालीll
           काय देवा माझी अशी चूक झाली


जेव्हा पाहतो बाळांना घास भरवतांना मायी
माझ्या हृदयावर अनंत घाव होई
मला दिसत नाही कोठेच माझी आई
अशी ही दैन्यवस्था का नशिबी आली?
            काय देवा माझी अशी चूक झाली

आजही तडफडतो आहे मी आईच्या प्रेमास
आजही आहे त्या वात्सल्याचा ध्यास
कोठे मिळेल हो मला माझ्या आईचा सहवास?
माझी ही अशी अवस्था का रे तू केली ?
            काय देवा माझी अशी चूक झाली