दुरावा

Started by jyoti s suryavanshi, December 30, 2015, 09:23:51 PM

Previous topic - Next topic

jyoti s suryavanshi


दुरावा

मी अजून हि तीच आहे पण तू मात्र बदलला
तुला ते कळत असेल किंव्हा नसेलही
तू बदलला हे मला मात्र पदोपदी जाणवत
तू सहज चेह्र्यवर मुकावटा चढावला

पूर्वी माझी बडबड तुला निरागस वाटायची
आता तीच तुला डोकेदुखी वाटते
सहज म्हणून जातो तुला अक्कल नाही
आणि आधी तर म्हणायचा तूच मला समजून घ्यायची

मला तुझी काळजी वाटते
तुला तर ते ही नाही उमजत
तू परत माझ्या जवळ येशील
या एकाच आशेवर आता जगते

तू माझ्या मनावर घाव करतो
मला  वेदना देऊन जातो 
हसण तर नाही पण रडण देतो
माझ्याशी तू किती कठोर वागतो

तुझं -माझं नात आजही तेच
फक्त थोडे क्षण निसटले
तुही तिथच आहे  मीही तिथच आहे
मग काय रे असं  झालं
आपलं नात हळूहळू गंजल

-ज्योती सूर्यवंशी