*** आठवणींची शाळा ***

Started by धनराज होवाळ, December 30, 2015, 09:49:34 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


🌹🙇🏼🌹👼🏼🌹🙇🏼🌹

🙇🏼🙇🏼आठवणींची शाळा🙇🏼🙇🏼

तुझ्या सततच्या विचाराने,
मनाचा भरला होता माळा..
तरीच स्वप्नात भरली होती,
तुझ्या आठवणींची ती शाळा..!!

या शाळेतली मजा वेगळीच,
होते प्रत्येकाची ईच्छापुर्ती..
म्हणूनच की काय या शाळेत,
होते प्रत्येकाची इथे भरती..!!

त्या आठवणींच्या शाळेत,
होते तुझ्या सोबतींचे क्षण..
तुझ्या फक्त एका भेटीसाठी,
तरसणारे माझे हे वेडं मन..!!

वेड्या मनाच्या त्या शाळेत,
स्वप्नांचा सुंदर क्लास भरतो..
पण पहाट होताच अचानक,
स्वप्नक्लास एक भास ठरतो..!!

पहाटेच्या त्या अलार्मची,
घंटा केव्हाच वाजली होती...
अन् तुझ्या आठवणींची शाळा,
अगदी तेव्हाच सुटली होती...!!!
-
स्वलिखित...
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
(धनराज होवाळ)
कुंडल, जि. सांगली
मो. ९९७०६७९९४९
🙏🏻🌹🙏🏻🌹👼🏼🌹🙏🏻🌹🙏🏻