तुझी आठवण

Started by rushi@rugvedi, December 31, 2015, 09:33:26 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

तुझ्या आठवणीचा क्षण अन क्षण
मनात तसाच जपून ठेवलाय
तुझी आठवण येताच सखे
तो क्षण अन क्षण मी पुन्हा उलगडून पाहिलंय.

मग डोळे भरून येत होते
मन आवरायला तयारच नहव्ते
ते सारखे म्हणत होते
एकदा तरी तिला पाहायचं होते

पण मी तरी काय करणार
ती माझ्यापासून खूपच दूर होती,
कधी मनातील भावना तर कधी डोळ्यातील अश्रू
महणून ती
माझ्या हाताच्या ओंजळीत सामावत होती,

तुझ्या आठवणीचा क्षण अन क्षण
मनात तसाच जपून ठेवलाय
तुझी आठवण येताच सखे
तो क्षण अन क्षण मी पुन्हा उलगडून पाहिलंय.

ऋषिकेश सोनवणे
९९२३२०००८०