नुतन वर्षाभिनंदन

Started by Dnyaneshwar Musale, January 01, 2016, 08:47:35 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

चालतं वर्ष
सरत गेलं
नवीन वर्षाने मात्र
उजळत केलं
बरचं काही यात
घडलं
प्रेमाचं नात मात्र
एकमेकांशी वाढलं.

सगळीच स्वप्न पूर्ण
नाही झाली
उरलेली बाकी म्हणुन
या  वर्षात आली
चार  चौघांची ओळख
नक्कीच वाढली
जिव्हाळ्याची नाती
त्यातुनच घडली .

आपुलकीची ही
एक कॉफी
काही चुकले असेल
तर मागतो मी माफी
या वर्षात
येवो सुख समृद्धी
तुमच्या ताटी
मनपूर्वक शुभेच्छा
नुतन वर्षासाठी.💐💐💐💐