अजून आहे बरेच साठलेले....!

Started by जयंत पांचाळ, January 01, 2016, 12:48:49 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

निशेत पडलेले
  स्वप्नात जडलेले
    जागेपणी उलगडलेले
      सत्यात जाणवलेले
        प्रत्यक्ष्यात संपलेले
सांगायचे कोडे एक भांबावलेले,

अजून आहे बरेच साठलेले....

क्षणात घडलेले
  रम्य सजलेले
    भेटीत गुंजलेले
      अबोल भंगलेले
        प्रत्यक्ष्यात खंगलेले
सांगायचे गुज एक रखडलेले,

अजून आहे बरेच साठलेले....

टिपूर सजलेले
  चांदणे निजलेले
    हळवे तुटलेले
      स्वप्नांसाठी भारलेले
        प्रत्यक्ष्यात मंतरलेले
सांगायचे स्वप्न एक हरवलेले,

अजून आहे बरेच साठलेले....

हसताना रडलेले
  भेटीत विरलेले
    हदयात कोरलेले
      क्षण विणलेले
        प्रत्यक्ष्यात अंतरलेले
सांगायचे क्षण ते आठवलेले,

अजून आहे बरेच साठलेले....

वणव्यात जळलेले
  पान वाळलेले
    उशीरा कळलेले
      बंध जमलेले
        प्रत्यक्ष्यात वरमलेले
सांगायचे नाते एक कर्दमलेले,

अजून आहे बरेच साठलेले....

पडताना धरलेले
  कटाक्षात भुललेले
    हळुवार पकडलेले
      मिठीत विसावलेले
        प्रत्यक्ष्यात गोंधळलेले
सांगायचे गहण एक भारावलेले,

अजून आहे बरेच साठलेले....

- जयंत पांचाळ (३०/११/२०१५)
  ९८७००२४३२७