सार्थ जीवन

Started by शिवाजी सांगळे, January 01, 2016, 10:09:48 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सार्थ जीवन

प्रत्येक जीवा त्या
जडची असे ओझे,
आसक्तीतुन मुक्ती
नच सहजी साजे !

भोग गत जन्माचे
भोगता कष्ट जीवा,
होतील क्षीण सारे
साधता भक्ती ठेवा !

ठरो सार्थ जीवन
करोनी ध्यान जप,
महिमा नाम थोर
मिटवी दोष पाप !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९