राधे-कृष्ण

Started by Shrikant1, January 02, 2016, 08:23:44 PM

Previous topic - Next topic

Shrikant1

राधे तुझा वैशाख लागला ,
आज तुझा कान्हा मथुरेला चालला   //

मान्सून पुरताच सवळा नभ, तुझ्या साथीचा राहला ,
घे चिंब भिजुनी जो पर्यंत नभ आहे हा सवळा ,

जेंव्हा सावळ्य़ा नभाच्या पाण्याची , तुझ्या डोळ्यात भरती येई ,
तीच भरती नभाला, तुझी आस लावी ,

राधे तू श्रावणातली सर ,  तो आकाशातला सावळा नभ ,
तू जमिनीवरची नदी , तर तो समुद्र ,

शेवटी दोघेही एकच , कधी तु राधा तर तो कृष्ण ,
कधी तो राधा , तर तू कृष्ण ,