=* ती सावित्रीबाई*=

Started by SHASHIKANT SHANDILE, January 04, 2016, 10:32:51 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

जी स्त्रीशक्ती उभारून
अडचणी मागे सारून
जगली लढली जिंकली
ती सावित्रीबाई

कुणाशी वैर न मानता
शेनही अंगावर घेतले
पुस्तक पाटी सावरली
ती सावित्रीबाई

किती तिची ख्याती सांगू
निशब्द माझे शब्द सदा
सर्वांची जी आदर्श ठरली
ती सावित्रीबाई
----------------
(सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना माझे नमन)
---------------
शशिकांत शांडिले SD
दि.०३/०१/२०१६
भ्र. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!